ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाला टाळे, कारण.. - बी. एस येडीयुरप्पा

मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे 'कृष्णा' हे निवासस्थान असून तेथे त्यांचे कार्यालयही आहे. या ठिकाणी काम करणारी एक महिला कर्मचारी दोन दिवसांपासून कार्यालयात आली नाही. तिच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कार्यालय बंद करण्यात आले आहे.

बी. एस. येडीयुरप्पा
बी. एस. येडीयुरप्पा
author img

By

Published : Jun 19, 2020, 5:18 PM IST

बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा यांच्या कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याच्या पतीला कोरोनाची लागण झाल्यानंतर कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. आता संपूर्ण कार्यालयात निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे 'कृष्णा' हे निवासस्थान असून तेथे त्यांचे कार्यालयही आहे. या ठिकाणी काम करणारी एक महिला कर्मचारी दोन दिवसांपासून कार्यालयात आली नाही. तिच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कार्यालय बंद करण्यात आले आहे. महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नसली तरी सुरक्षेचा उपाय म्हणून कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सर्व महत्वाच्या बैठका कृष्णा निवासस्थानाएवजी विधानसभेत घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.

याबरोबरच बंगळुरु रेल्वे विभागातील अधिकाऱयाला कोरोनाची लागण झाल्यानंतर विभागीय कार्यालय बंद करण्यात आले आहे. संपुर्ण कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सोमवारी कार्यालय पुन्हा उघडण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details