बंगळुरु - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे सायंकाळी बंगळुरु येथील हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावर आगमन झाले. ते आज अमेरिकेतून भारतात परतले. दिल्लीहून विशेष विमानाने ते बंगळुरुला पोहोचले. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसच्या ११ आमदारांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामे दिल्यामुळे तेथील राजकीय स्थिती नाजूक बनली असून कुमारस्वामींचे मुख्यमंत्री पदही धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ते आपला अमेरिकेचा खाजगी दौरा अर्ध्यावर सोडून बंगळुरुला परत आले आहेत.
मुख्यमंत्री कुमारस्वामी याचे बंगळुरुमध्ये विमानतळावर आगमन
आज सायंकाळी जेडीएसने आमदारांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, वरिष्ठ काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार आणि जेडीएस अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी तातडीने परस्परांची भेट घेऊन चर्चा केली.
आज सायंकाळी जेडीएसने आमदारांची बैठक बोलावली आहे. कुमारस्वामी ताज वेस्ट एण्ड हॉटेलमध्ये आमदारांशी चर्चा करतील. दरम्यान, वरिष्ठ काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार आणि जेडीएस अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी तातडीने परस्परांची भेट घेऊन चर्चा केली.
दरम्यान, काँग्रेस-जेडीएसच्या ११ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवले आहेत. त्यामुळे अवघे १३ महिन्यांचे आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. राजीनामा देणाऱ्यांपैकी जेडीएसचे आमदार एच. विश्वनाथ यांनी एकूण १४ आमदारांनी राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी अद्याप कोणताही राजीनामा संमत केलेला नाही. राजीनामा दिलेल्यांपैकी १० आमदार सध्या मुंबईत आहेत.