बंगळुरु (कर्नाटक) - मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांची प्रकृती ठीक असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने ते सध्या रुग्णालयात दाखल झाले आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण - मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.
हेही वाचा -केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना विलगिकरणाचे आवाहन
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी स्वतःच ट्विट करून आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली. रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांनी ट्विट केले आहे. 'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. मी विनंती करतो की, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करावी आणि स्वत:ला सेल्फ क्वारंटाईन ठेवावे' असे येडियुरप्पा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.