बंगळुरू - कर्नाटकमधील विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेले काँग्रेस आणि 'जेडीएस'चे १७ आमदार हे पोटनिवडणूक लढवू शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर आता, ते आमदार उद्या (गुरुवार) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले आहे.
कर्नाटकमध्ये येडीयुरप्पाच! अपात्र ठरवलेले सर्व आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश - येडीयुरप्पा सरकार
कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात असा निर्णय दिला होता.
Karnataka Rebel MLAs to join BJP