बंगळुरू (कर्नाटक) -कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आठ दिवसांपूर्वी मनिपाल रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. ते आता बरे झाले असून त्यांना रुग्णाालयातून सुटी मिळणार आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा कोरोनामुक्त, उद्या मिळणार 'डिस्चार्ज' - कर्नाटक मुख्यमंत्री कोरोनामुक्त बातमी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा कोरोना अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला आहे. यामुळे त्यांना उद्या रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे.
yediyurappa
येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली होती. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत 2 ऑगस्टला माहिती दिली होती. त्यांच्यावर बंगळुरू येथील मनिपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांची आज पुन्हे कोरोना चाचणी घेतली असता, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे उद्या (दि. 10 ऑगस्ट) त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.