बंगळुरू- देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांपेक्षाही जास्त काळ उलटून गेला तरीही अस्पृश्यता समूळ नष्ट झालेली नाही. कर्नाटकामध्ये एका खासदाराला दलित असल्यामुळे मंदिरामध्ये जाण्यापासून गावातील लोकांनी रोखलं. चित्रदुर्ग जिल्ह्याचे खासदार एन. नारायणस्वामी यांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागला.
संतापजनक.. दलित असल्याने भाजप खासदाराला मंदिर प्रवेश नाकारला - मंदीर प्रवेश बातमी
तुमकूर जिल्ह्यातील पेमानहळ्ळी आणि गोलार हट्टी गावांना भेट देण्यास खासदार महाशय गेले होते. त्यावेळी नारायणस्वामी यांना गावातील लोकांनी मंदिरात जाण्यापासून रोखलं.
तुमकूर जिल्ह्यातील पेमानहळ्ळी आणि गोलार हट्टी गावांना भेट देण्यास खासदार महाशय गेले होते. त्यावेळी नारायणस्वामी यांना गावातील लोकांनी मंदिरात जाण्यापासून रोखलं. दलितांना आम्ही आमच्या पवित्र मंदीरांपासून कायम दुर ठेवलं आहे. आम्ही पिढीपार ही परंपरा पाळत आलोयं. त्यामुळे तुम्हालाही मंदिरामध्ये जाण्यापास परवानगी नाही, असे गावातील लोकांनी त्यांना सांगितले.
अशा अंधश्रद्धा आणि खोट्या समजूती लोकांमधून गेल्या पाहिजेत. या बाबत जनजागृती मोहीम राबवण्यात यावी, असे खारदार नारायणस्वामी यांनी म्हटले आहे. संसदेमध्ये लोकांना आवाज मांडणाऱ्या प्रतिनिधीला जर अस्पृश्यतेचा सामना करावा लागत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांबद्दल न बोललेलंच बरे.