बंगळुरु - कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेस- जेडीएसच्या १४ बंडखोर आमदांराना अपात्र ठरवले आहे. आतापर्यंत एकूण १७ आमदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे. १५ व्या विधानसभेचे विसर्जन होईपर्यंत अपात्र आमदारांना निवडणूक लढवता येणार नाही, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपचे सरकारही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा यांनी उद्या (सोमवारी) विश्वासदर्शक ठराव मांडण्याची विनंती केली असल्याची माहिती अध्यक्ष रमेशकुमार यांनी दिली. मागील काही दिवासांपासून राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे नैराश्येच्या गर्तेत सापडलो असल्याचे रमेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अपात्र ठरवण्यात आलेल्या काँग्रेसच्या १४ आमदारांची नावे
मुनीरत्ना, सुधाकर, एम. टी. बी. नागराज, रोशन बेग, भारती बसवराज, प्रताप गौड, सोमशेखर, विश्वनाथ, बी. सी. पाटील , शिवराम हेब्बर, नारायन गौडा, गोपलाई, आनंद सिंह, श्रीमंत पाटील.