बंगळुरु - कर्नाटकात राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेस-जेडीएसच्या सरकारमधील काँग्रेसच्या ८ तर जेडीएसच्या ३ आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यातच राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी सिद्धरामय्या गटाच्या काँग्रेसच्या तीन आमदारांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली आहे. एस. टी. सोमशेखर, बराथी बसवराज आणि मुनिरत्न अशी या आमदारांची नावे आहेत.
सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री करा; राजीनामा दिलेल्या ३ काँग्रेस आमदारांची मागणी - ३ congress mla
'राज्यात भाजप सर्वाधिक आमदारांची संख्या असलेली एकमेव पक्ष असून आमच्याकडे १०५ आमदार आहेत. नवे सरकार स्थापन झाले तर त्यामध्ये बी. एस. येदियुराप्पा मुख्यमंत्री होतील,' असे भाजपा नेते सदानंद गौडा यांनी म्हटले आहे.
![सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री करा; राजीनामा दिलेल्या ३ काँग्रेस आमदारांची मागणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3764781-825-3764781-1562416771838.jpg)
काँग्रेस-जेडीएसच्या मिळून ११ आमदारांनी राजीनामे दिल्याने कर्नाटक सरकार अल्पमतात येऊ शकते. या आमदारांनी कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. मात्र, या प्रकरणावर आपण सोमवारी भाष्य करू असे कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव हे सध्या युकेमध्ये असून ते उद्या बंगळुरूला परतणार आहेत. त्यानंतर राज्यातील या राजकीय परिस्थितीबाबत निर्णय होऊ शकतो.
घटनेनुसार राज्यात राज्यपाल हे सर्वोच्च असून त्यांनी आम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी निमंत्रण दिले तर आम्ही ते सिद्ध करु. राज्यात भाजप सर्वाधिक आमदारांची संख्या असलेली एकमेव पक्ष असून आमच्याकडे १०५ आमदार आहेत, असे भाजपा नेते सदानंद गौडा यांनी म्हटले आहे. नवे सरकार स्थापन झाले तर त्यामध्ये बी. एस. येदियुराप्पा मुख्यमंत्री होतील, असेही त्यांनी जाहीर करुन टाकले.