बंगळुरू - कर्नाटकमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटकमधील भाजपच्या आमदारांनी तणावमुक्तीसाठी योग कार्यशाळेचा अनुभव घेतला. हे आमदार सध्या रामदा हॉटेलमध्ये राहत आहेत. हॉटेलच्या लश गार्डनमध्ये एका प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली या आमदारांनी विविध योगासने केली.
याआधी १० जुलै रोजी धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या काही आमदारांनी देखील गॉल्फशायर क्लब येथे तणावमुक्तीसाठी अशाच एका योग कार्यशाळेचा अनुभव घेतला होता. काही ट्रॅव्हल वेबसाईट्सच्या मते, याठिकाणी राहण्यासाठी एका रात्रीसाठी १५ हजार मोजावे लागतात.
जेडी(एस)ने या महिन्याच्या सुरुवातीला बंगळुरुपासून २५० किलोमीटर दूर असलेल्या मदिकेरीमध्ये १० बंगले, १५ डिलक्स रुम्स आणि १० कॉटेजेस तीन दिवसांसाठी बुक केले होते.