महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

LIVE केरळ विमान दुर्घटना : मृतांच्या वारसांना 10 लाख, तर गंभीर जखमींना दोन लाखांची मदत देणार - हरदीपसिंह पुरी

शुक्रवारी एअर इंडियाच्या बोईंग 737 या विमानाचा केरळमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात मुख्य पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

Karipur AI flight mishap
केरळ विमान दुर्घटना

By

Published : Aug 8, 2020, 6:42 AM IST

Updated : Aug 8, 2020, 1:46 PM IST

कोझीकोड - एअर इंडियाच्या बोईंग 737 या विमानाचा शुक्रवारी केरळमध्ये अपघात झाला. विमान दुबईहून करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत होते. विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाचा अपघात झाला. विमानात 191 प्रवासी होते. या अपघातात मुख्य पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 123 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील अनेक जण गंभीर जखमी आहे.

LIVE -

  • या विमानाचे संचालन करणारे कॅप्टन दीपक साठे आमच्या अत्यंत अनुभवी व प्रतिष्ठित कमांडरांपैकी एक होते. त्यांनी या वर्षासह तब्बल 27 वेळा या एअरफील्डवर विमान उतरले होते - हरदीपसिंग पुरी, हवाई वाहतूक मंत्री
  • अंतरिम मदत म्हणून मृताच्या नातेवाईकांना 10 लाख, गंभीर जखमींना दोन लाख तर किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत देणार - हवाई वाहतूक मंत्र्यांची माहिती
  • राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कोझिकोड मेडिकल कॉलेजला भेट दिली. याठिकाणी कोझिकोड विमान दुर्घटनेत जखमी झालेल्या अनेक प्रवाशांना दाखल करण्यात आले आहे.
  • विमानाचा डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर पुनर्प्राप्त केला आहे. एअरक्राफ्ट अपघात अन्वेषण ब्यूरो (एएआयबी) चौकशी करीत आहे. - हरदीप सिंह पुरी, हवाई वाहतूक मंत्री
  • काल (शुक्रवारी) संध्याकाळी हवाई अपघातानंतर स्थिती आणि येथील मदत, उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी येथे पोहोचलो. वरिष्ठ नागरी उड्डाण अधिकारी आणि व्यावसायिकांशी सल्लामसलत करतील - हरदीप सिंह पुरी, हवाई वाहतूक मंत्री
  • हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी कोझिकोड विमानतळावर दाखल.
  • दुर्घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार सीआयएसएफचे सहायक उपनिरीक्षक अजित सिंह यांनी दुर्घटनेबाबत आपला अनुभन सांगितला.
  • गरजूंना मदत करण्यात तो नेहमी आधी असायचा. त्याचे शिक्षक अजूनही त्याचे कौतुक करतात. तो एक महान मुलगा होता. - नीला साठे (मुख्य पायलट मृत दिपक साठे यांच्या आई)
  • केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान कोझिकोड विमानतळावर दाखल
  • विमान अपघात अन्वेषण ब्यूरोने (एएआयबी) विमानामधून डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर पुनर्प्राप्त केले. पुढील तपासासाठी ते दिल्लीला आणले जाईल.
  • केरळमधील या विमान दुर्घटनेशी संबंधित सरकारने हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. ते पुढीलप्रमाणे- 056 546 3903, 0543090572, 0543090572, 0543090575
  • दरम्यान, या दुर्घटनेबाबत अनेक मान्यवरांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली, जपानचे भारतातील राजदूत सातोशी सुझुकी यांचाही समावेश आहे.
  • वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईवरून भारतात आलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या AXB-1344 विमानाचा कोझीकोडमध्ये अपघात झाला. पावसाळी वातावरणात विमान धावपट्टीवरून घसरले. विमान उतारावर ३५ फूट खाली गेले. यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले, असं ट्विट हरदीपसिंग पूरी यांनी केलं आहे.
  • दरम्यान, विमानातील 190 प्रवाशांमध्ये 174 प्रौढ, 10 बालकं आणि 6 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. विमानाच्या दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. यातील मुख्य पायलट कमांडर कॅप्टन दिपक साठे आणि सहपायलट अखिलेश सिंह यांचा समावेश आहे. मुख्य पायलट दिपक साठे हे मुंबई येथील रहिवासी होते. तर अखिलेख हे उत्तरप्रदेश राज्यातील रहिवासी होते. तर 4 केबिन क्रू मेबर्स वाचले.
  • या दुर्घटनेनंतर विविध जिल्ह्यांमधील 100 हून अधिक रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या आणि खासगी वाहनांनी बचाव कार्यात भाग घेतला.
  • एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलिस यांनी समन्वयाने काम केले. दीड तासाच्या आत सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विमानतळ अधिकाऱ्यांनी प्रवाशांचे सामान सुखरुप हस्तांतरित केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
Last Updated : Aug 8, 2020, 1:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details