अहमदाबाद - काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आज अहमदाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलेला एक व्हिडीओ दाखवला. हा व्हिडिओ दाखवत असताना कपील सिब्बल यांनी नोटबंदीच्या काळात गुजरातच्या भाजप कार्यालयात करोडो रुपयांच्या नवीन नोट जमा करण्यात आल्याचे सांगितले.
स्टिंग ऑपरेशन : नोटबंदीच्या काळात भाजप कार्यालयात होत्या नवीन नोटांच्या थप्या ! - ahmedabad
व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती भाजप कार्यालयातील आहे. जो या व्यक्तीविषयी माहिती देईल त्याला एक लाख रुपयाचे बक्षिस देणार असल्याची घोषणा सिब्बल यांनी केली.
कपिल सिब्बल म्हणाले, ही घटना अहमदाबादमधील आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक व्यक्ती नोट बदलण्याला दुजोरा देत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती भाजप कार्यालयातील आहे. जो या व्यक्तीविषयी माहिती देईल त्याला एक लाख रुपयाचे बक्षिस देणार असल्याची घोषणा सिब्बल यांनी केली.
सिब्बल म्हणाले, ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीची घोषणा करण्यात आली. यात एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा बंद करणार असल्याचे सांगितले होते. दहशतवाद, काळा पैसा, फेक करन्सी रोखण्यासाठी हे करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यानंतर लोक रांगेत थांबले, एटीएम बंद होते, बँकेत पैसे मिळत नव्हते, अशी परिस्थिती होती.