नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील हिंसाचारानंतर काँग्रेसने भाजपला राजधर्माचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यावरून भाजप आणि काँग्रेसमधील नेत्यांमध्ये जुंपल्याची पाहायला मिळत आहे. सोनिया गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी भाजपला राजधर्म शिकवू नये असे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हणत काँग्रेसला फटकारले होते. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपील सिब्बल यांनी या वादत उडी घेतली आहे. त्यांनी ट्विटवरून रविशंकर प्रसाद यांना उत्तर दिले आहे.
'आम्ही तुम्हाला कसा रामधर्म शिकवणार? तुम्ही गुजरातमध्ये वाजपेयीजींचा सल्ला ऐकला नाही. आमचे काय ऐकणार? दुसऱ्याचे ऐकून घेणं, शिकणं आणि राजधर्माचं पालन करणं हे गुण तुमच्या सरकारमध्ये नाहीत', असा टोला कपील सिब्बल यांनी भाजप आणि रविशंकर प्रसाद यांना लगावला आहे.