हमीरपूर (उत्तर प्रदेश) - युपीतील पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा साथीदार अमर दुबे याला एसटीएफ उत्तर प्रदेश आणि स्थानिक पोलिसांनी चकमकीत कठंस्नान घातले. ही चकमक जनपद हमीरपूर मौदहा पोलिस स्टेशनच्या हद्दीत झाली. दरम्यान अमर दुबे याच्या नावावर गुन्हा दाखल आहे.
दुसरीकडे याच पोलीस हत्याकांड प्रकरणी ४० पोलिसांच्या टीम, गँगस्टर विकास दुबे याला पकडण्यासाठी गठित करण्यात आल्या आहेत. पोलिसांना विकास दुबे फरिदाबादमध्ये लपल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी तो थांबलेल्या हॉटेलवर छापा मारला. पण या छाप्यात विकास दुबेला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. मात्र, पोलिसांनी या छाप्यात विकास दुबे याच्या एका नातेवाईकाला अटक केली. सूत्रांच्या माहितीनुसार, याच हॉटेलमध्ये विकास दुबेही लपला होता.
दरम्यान, कानपूरमधील बिक्रू खेड्यात विकास दुबे याच्या टोळीवर छापा टाकताना झालेल्या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. सध्या उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेचा शोध घेत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दुबेला पकडण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली आहे. विकास दुबेचा राज्यभरात शोध सुरू आहे.