लखनऊ (उत्तर प्रदेश) -कानपूर आणि इटावा येथे गुरुवारी सकाळी दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये कुख्यात गुंड विकास दुबे याच्या दोन साथीदारांना ठार मारण्यात आले आहे. प्रभात मिश्रा आणि रणबीर शुक्ला अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आज (गुरुवारी) सकाळच्या सुमारास घडली.
प्रभात मिश्रा यांला बुधवारी अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला जिल्हा न्यायालयाने फरीदाबाद येथे रिमांडवर पाठविले. प्रभातने पोलीस कोठडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पायात गोळी घालण्यात आली. यावेळी झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती कानपूरचे पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.
आकाश तोमर (एसएसपी, इटावा) कानपूरमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत गुंड विकास दुबे याचा आणखी एक जवळचा साथीदार रणवीर शुक्ला याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. उत्तर प्रदेशच्या विशेष टास्क फोर्सने ही कामगिरी केली. विकास दुबे याने कानपूर येथील चकमकीत 8 पोलीसांना ठार मारले होते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
अमर दुबे याच्यावर 25 हजारांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. हमीरपुर जिल्ह्यतील मौदाहा गावात चकमकीत तो मारला गेला, अशी माहिती स्पेशल टास्क फोर्सचे महानिरीक्षक अमिताभ यश यांनी दिली.
जे एन सिंग (एडीजी, कानपूर) स्पेशल टास्क फोर्सच्या मते, अमर जिल्ह्यात असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती. जेव्हा त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या चकमकीत तो ठार झाला.