छपरा -जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि सीपीआयचे नेते कन्हैय्या कुमार यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात वाहनांचे नुकसान झाले असून कन्हैय्या कुमार थोडक्यात बचावले आहेत.
बिहारमध्ये कन्हैय्या कुमारच्या ताफ्यावर हल्ला - कन्हैय्या कुमार
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि सीपीआयचे नेते कन्हैय्या कुमार यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे.
कन्हैय्या कुमारच्या ताफ्यातील दोन कारचे हल्ला झाल्यामुळे नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये कन्हैय्या कुमार यांच्या सहकाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे. कन्हैय्या कुमार सिवान येथून छपरा येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात सभा घेण्यासाठी जात होते. यावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या हल्ल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
कन्हैय्या कुमार सुरक्षित असून त्यांचे काही सहकारी जखमी झाले आहेत, ही माहिती सारण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर किशोर राय यांनी दिली. दरम्यान बजरंग दलाच्या चिथावणीमुळेच काही लोकांनी आमच्यावर हल्ला केला, असा आरोप कन्हैय्या कुमारच्या सहकाऱ्यांनी केला आहे. यापूर्वी गोपालगंज येथेही कन्हैय्या कुमरा यांच्या सभेचा विरोध झाला होता.