महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा निवडणूक : कन्हैय्या कुमारचा नितीश सरकारवर जोरदार हल्लाबोल

सध्या बिहारमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगतांना दिसत आहे. दरम्यान सीपीआयचे उमेदवार विकास चंद्र मंडल यांच्या प्रचारार्थ शनिवारी आयोजीत करण्यात आलेल्या प्रचार सभेला भाकपाचे नेते कन्हैय्या कुमार यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत काही सवाल उपस्थित केले आहेत.

bihar assembly election 2020
कन्हैय्या कुमार

By

Published : Nov 1, 2020, 9:48 PM IST

पूर्णिया - सध्या बिहारमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. दरम्यान सीपीआयचे उमेदवार विकास चंद्र मंडल यांच्या प्रचारार्थ शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेला भाकपाचे नेते कन्हैय्या कुमार यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत काही सवाल उपस्थित केले आहेत.

कन्हैय्या कुमार यांचा नितीश सरकारवर जोरदार हल्लाबोल

एकीकडे सरकार म्हणत आहे की, बिहारमधील शिक्षण, आरोग्य या सारख्या गोष्टींवर खर्च करण्यासाठी त्यांच्या तिजोरीत पैसे नाहीत. मात्र दुसरीकडे प्रचारसभेसाठी सत्ताधाऱ्यांकडून 30 हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे. मग हा पैसा नेमका त्यांनी कुठून आणला?, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे असे कन्हैय्या कुमार यांनी म्हटले आहे. राज्यातील शिक्षण, विकास आणि आरोग्य यावरून तुम्ही जेव्हा सरकारला प्रश्न विचाराल, तेव्हा ते तुम्हाला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये गुंतून ठेवतील अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

दरम्यान यावेळी कन्हैयाकुमार यांनी नितीश कुमार यांच्यावर देखील हल्लाबोल केला. बिहारमधील शिक्षण, आरोग्य व्यवस्था याबात हे सरकार निष्क्रीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये भाजपसोबत लोजपने देखील युती केली आहे. मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या जदयूशी लोजपचा अंतर्गत वाद आहे. हा वाद भाजपसाठी बिहारमध्ये डोकेदुखी ठरत आहे. यावरून देखील कन्हैयाकुमार यांनी भाजपला चिमटा काढला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details