देहराडून - कमलेश भट्ट या तरुणाचा दुबईला माघारी पाठविण्यात आलेला मृतदेह आज रात्री 1 वाजता पुन्हा भारतात आणण्यात येणार आहे. दुबईवरून विमानाने कमलेश भट्टसह तिन्ही भारतीयांचे मृतदेह दिल्लीला आणण्यात येणार आहेत, अशी माहिती ईटीव्ही भारतला मिळाली आहे. मृतदेह घेण्यासाठी विमानतळ प्रशासनाने कमलेशच्या कुटुंबीयांना बोलविले आहे.
अखेर आज कमलेश भट्टचा मृतदेह अबुधाबीवरून भारतात आणणार - Kamlesh Bhatt's body will return from Abu Dhabi
आज रात्री 2.30पर्यंत कमलेशचा मृतदेह विमानतळावरून बाहेर आणण्यात येईल, सोबत केरळ आणि पंजाबच्या दोन व्यक्तींचे मृतदेहही आणण्यात येणार आहे.
आज रात्री 2.30पर्यंत कमलेशचा मृतदेह विमानतळावरून बाहेर आणण्यात येईल, सोबत केरळ आणि पंजाबच्या दोन व्यक्तींचे मृतदेहही दुबईवरून माघारी आणण्यात येणार आहेत. दुबईत हृद्यविकाराच्या झटक्याने कमलेश भट्टचा मृत्यू झाला होता.
कमलेशचा मृतदेह घरी कसा आणावा याची कुटुंबीयांना काळजा होती. दिल्लीवरून मृतदेह ऋषिकेशला आणून अंत्यसंस्काराची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यानुसार मृतदेह दिल्लीवरून ऋषिकेशला आणण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे माध्यम सल्लागार -रमेश भट्ट यांनी ईटीव्ही भारतला यासंबधी माहिती दिली.