भोपाळ -ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मध्यप्रदेशातील कमलाथ सरकार धोक्यात आले असल्याची चर्चा आहे. सिंधिया यांच्याबरोबर २२ आमदारांनीही राजीनामा दिला आहे. मात्र, आज (शुक्रवार) मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांची भेट घेत बहुमत सिद्ध करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. यासोबतच भाजप आमदारांचा घोडेबाजार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मध्यप्रदेश सत्तापेच: कमलनाथ सरकार बहुमत सिद्ध करण्यास सज्ज; राज्यपालांना दिलं पत्र
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांची भेट घेत बहुमत सिद्ध करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच भाजप आमदारांचा घोडेबाजार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपने काँग्रेसचे आमदार बंगळुरुत डांबून ठेवले आहेत, त्यांना मुक्त करण्याची विनंती कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे केली. सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकार अल्पमतात गेले आहे. मात्र, आम्ही बहुमत सिद्ध करू असा दावा काँग्रेसने केला आहे. राजीनामे दिलेले काही आमदार भाजसोबत जाण्यास तयार नसल्याची माहिती मिळत आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेचच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची केंद्रीय मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये नाराज असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच सिंधिया यांनी अमित शाह आणि पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली आहे.