महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'तोंड चालवण्यामध्ये आणि देश चालवण्यामध्ये खूप फरक असतो' - संत रविदास जंयती

मोदींच्या कार्यकाळामध्ये देशामध्ये बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली आहे. देशातील समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी मोदी कधी राष्ट्रवादावर, तर कधी पाकिस्तानवर तर कधी सीएएवर बोलतील. मात्र, कधीच तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणार नाहीत, असा हल्लाबोल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोदींवर केला.

'तोंड चालवण्यामध्ये आणि देश चालवण्यामध्ये खुप फरक असतो'
'तोंड चालवण्यामध्ये आणि देश चालवण्यामध्ये खुप फरक असतो'

By

Published : Feb 10, 2020, 1:10 PM IST

भोपाळ -मध्य प्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बेरोजगारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तोंड चालवण्यामध्ये आणि देश चालवण्यामध्ये खूप फरक असतो, अशी टीका त्यांनी केली. संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त शहरातील पीटीसी मैदानात आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

'मोदींच्या कार्यकाळामध्ये देशामध्ये बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली आहे. देशातील समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी मोदी कधी राष्ट्रवादावर, तर कधी पाकिस्तानवर तर कधी सीएएवर बोलतील. मात्र, कधीच तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणार नाहीत. पंतप्रधान मोदींची ही कला आता जनतेने ओळखली आहे. तोंड चालवण्यामध्ये आणि देश चालवण्यामध्ये खूप फरक असतो', अशी टीका कमलनाथ यांनी केली. भाजप सरकारने मध्य प्रदेश सरकारची तिजोरी खाली केली. काँग्रेसचा राज्यातील परिस्थिती बदलण्यावर भर असून याचा फायदा नफा गुंतवणुकीच्या स्वरुपात मिळेल. आम्ही तुम्हाला कधीच निराश करणार नाही. काँग्रेसचा काम करण्यावर विश्वास आहे, असेही कमलनाथ म्हणाले. तसेच गेल्या 15 महिन्यात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला.

ABOUT THE AUTHOR

...view details