महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊऩचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलबुर्गी पोलिसांची अनोखी शिक्षा, योगासने करायला लावून मेणबत्त्यांची दिली भेट - Karnataka police

या सर्वांना पुन्हा लॉकडाऊनचे उल्लंघन करणार नसल्याची शपथ देऊन सोडण्यात आले. पंतप्रधानांनी आज रात्री नऊ वाजता मेणबत्ती पेटवण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सर्व लोकांना मेणबत्ती भेट दिली.

Kalaburgi police force yoga session on lockdown violators, gift candles
लॉकडाऊऩचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलबुर्गी पोलिसांची अनोखी शिक्षा, योगासने करायला लावून मेणबत्त्यांची दिली भेट

By

Published : Apr 5, 2020, 3:11 PM IST

कलबुर्गी (कर्नाटक) - देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही नियमांचे उल्लंघन करणार्‍यांची कमी नाही आहे. पोलिसही नियम पायदळी उडविणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी नवनवे प्रयोग करत आहेत. शनिवारी शहरातील एका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी योग सत्र, शारीरिक व्यायाम आणि शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून लॉकडाउनचे उल्लंघन करणार्‍या 50 जणांना ताब्यात घेतले.

लोक व्यायाम करण्यात मग्न झाले होते. कॉटन मार्केट जवळ एक योग केंद्रासारखा देखावा आहे. हे नियमित योग केंद्र नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते. लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍यांना परावृत्त करण्यासाठी ही शक्कल लढवली असल्याचे चौक पोलीस ठाण्याचे सर्कल इन्स्पेक्टर शकील अंगडी यांनी सांगितले.

सहभागी लोक आणि पोलीस कर्मचारी यांच्यात एकमेव साम्य होते, ते म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील कोरोनाचा मुखवटा. यातील सर्व सहभागी लोकांना लॉकडाउनचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती.

या सर्वांना पुन्हा लॉकडाऊनचे उल्लंघन करणार नसल्याची शपथ देऊन सोडण्यात आले. पंतप्रधानांनी आज रात्री नऊ वाजता मेणबत्ती पेटवण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सर्व लोकांना मेणबत्ती भेट दिली.

गेल्या तीन दिवसांत लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी 110 वाहने जप्त केली आहेत. गेल्या आठवड्यातही लॉकडाउन उल्लंघन करणार्‍यांना रस्त्याची सफाई करायला लावून पोलिसांनी शिक्षा केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details