महाराष्ट्र

maharashtra

भाजपाच्या नेत्याचा गौप्यस्फोट; 'कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात मोदींची मुख्य भूमिका'

By

Published : Dec 17, 2020, 12:58 PM IST

भाजपाकडून मध्य प्रदेशमध्ये कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ शेतकरी संमेलन भरवण्यात येत आहे. या संमेलनाला आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी संबोधीत केले. मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात मोदींना मुख्य भूमिका निभावल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय

इंदूर -केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे. यातच भाजपाकडून मध्य प्रदेशमध्ये कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ शेतकरी संमेलन भरवण्यात येत आहे. या संमेलनाला आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी संबोधीत केले. यावेळी बोलण्याच्या ओघात त्यांनी मध्य प्रदेश सरकारबाबत मोठा खुलासा केला. मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात मोदींना मुख्य भूमिका निभावल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. अखेर कमलनाथ यांचे सरकार पडण्याचे सत्य बाहेर आले, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.

मी तुम्हाला पडद्याच्या मागचे एक गुपीत सांगत आहे. हे तुम्ही कुणालाही सांगू नका. मी आतापर्यंत हे कोणालाच सांगितले नाही. मात्र, आज या व्यासपीठावर सांगत आहे. कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात मुख्य भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निभावली होती, धर्मेंद प्रधान यांनी नाही, असा गौप्यस्फोट कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे.

काँग्रेसची भाजपावर टीका -

कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानानंतर काँग्रेस नेते नरेंद्र सलूजा यांनी भाजपावर टीका केली. आमचे सरकार भाजपानेच पाडल्याचे आता कैलाश विजयवर्गीय यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केले आहे. काँग्रेस पहिल्यापासून हे सांगत आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे सरकार पडलं असे कारण भाजपाने आतापर्यंत दिले असून सत्यावर पडदा टाकला होता. मात्र, आता त्यांनी स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल केले आहे, असे नरेंद्र सलूजा म्हणाले.

काँग्रेसची भाजपावर टीका

गेल्या मार्च महिन्यात मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळलं -

काँग्रेसवर नाराज असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या 22 आमदारांनीही राजीनामा दिला. काँग्रेसकडून आमदारांना परत आण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, आमदारांचा पाठिंबा न मिळाल्याने कमलनाथ यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. काँग्रेसच्या बंडखोर 22 आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

हेही वाचा -काश्मीरमध्ये एक अतिरेकी ताब्यात; तर पंजाबमध्ये दोघांचा खात्मा..

ABOUT THE AUTHOR

...view details