नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यावर टीका होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी योगी सरकारचे समर्थन केले आहे. 'हे योगी सरकार आहे, कधीही बाजू पलटू शकते, असे कैलास विजयवर्गीय म्हणाले.
हे योगी सरकार, कधीही बाजू पलटू शकते - भाजपा नेते कैलास विजयवर्गीय
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला होता. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यावर टीका होत आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी योगी सरकारचे समर्थन केले आहे. 'हे योगी सरकार आहे, कधीही बाजू पलटू शकते, असे कैलास विजयवर्गीय म्हणाले.
कैलास विजयवर्गीय
याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात पोहोचले आहे. थोडी प्रतीक्षा करावी लागेल, सर्व आरोपी तुरुंगात जातील, असे ते म्हणाले.
तथापि, उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये 14 सप्टेंबरलाएका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला होता. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. चार तरुणांनी तिच्यावर बलात्कार करून, तिची जीभ कापली आणि मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला.