भोपाळ - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास जोशी यांचे वयाच्या 91 वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. जोशी यांनी रविवारी भोपाळ येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलास जोशी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन, मोदींनी व्यक्त केले दु:ख - मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलास जोशी
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास जोशी यांचे वयाच्या 91 वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून दु:ख व्यक्त केले. कैलास जोशी हे निष्ठावान आणि धाडसी नेते होते. त्यांनी मध्यप्रदेशच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिले. याचबरोबर त्यांनी मध्य भारतमध्ये संघाच्या उभारणीसाठी कठीन प्ररिश्रम घेतले होते, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
कोण होते कैलास जोशी ?
कैलाश जोशी यांचा जन्म १४ जुलै १९२९ ला झाला होता. जोशी हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते जून १९७७ ते जानेवारी १९७८ या काळात मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. याचबरोबर ते २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.