नवी दिल्ली - चांद्रयान-२ उड्डाणापूर्वीची सर्व तयारी झाली आहे. पहिल्या प्रयत्नावेळी उद्भवलेली तांत्रिक अडचण सोडवण्यात आली आहे. आज सायंकाळपासून प्रक्षेपणासाठी 'काऊंट डाऊन' सुरू करण्यात येईल, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चांद्रयान-२ उद्या झेपावणार; उड्डाणापूर्वीची सर्व तयारी झाली पूर्ण - के. सिवान - k sevan
चांद्रयान-२ उड्डाणापूर्वीची सर्व तयारी झाल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याआधी १५ जुलैला सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होते. मात्र, तांत्रिक कारणाने ते केवळ ५६ मिनिटे आधी उड्डाण रद्द करण्यात आले. उड्डाणाआधी क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या जॉईंटमधून गळती झाल्याचे निदर्शनास आले होते. GSLV MK ३ प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये ही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. यानंतर तातडीने उड्डाण रद्द करण्यात आले. आता २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ च्या प्रक्षेपण होणार आहे.