महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसला धक्का ! ज्योतिरादित्य सिंधियांचा कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला पाठिंबा

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसंदर्भात घेतलेला हा निर्णय योग्य आहे, असे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देणेही योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया

By

Published : Aug 6, 2019, 8:44 PM IST

Updated : Aug 6, 2019, 9:01 PM IST

भोपाळ -मध्य प्रदेशातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कलम ३७० हटवण्याचे समर्थन केले आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसंदर्भात घेतलेला हा निर्णय योग्य आहे, असे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देणेही योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सिंधिया यांनी #JammuAndKashmir & #Ladakh विषयी उचलण्यात आलेले पाऊल योग्य आहे, असे म्हटले आहे. 'मात्र, हे सर्व करताना संवैधानिक प्रक्रियेचे पालन केले असते तर, अधिक चांगले झाले असते. तसेच, यावर कोणीही प्रश्नचिन्हही उपस्थित केले नसते. तरीही ही बाब देशाच्या हिताची असल्याने मी याचे समर्थन करत आहे,' असे ट्विट त्यांनी केले आहे.

'अनिश्चितता आणि भीती यामुळे परिस्थिती अधिक बिघडत जाते. सरकारने अधिक खुले आणि पारदर्शक बनले पाहिजे. तसेच, लोकांना आणि विरोधकांनाही विश्वासात घेणे आवश्यक आहे,' असेही सिंधिया यांनी म्हटले आहे.

मध्यप्रदेशातील कोणताही काँग्रेस नेता सध्या केंद्र सरकारच्या जम्मू-काश्मीरविषयीच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देण्यास इच्छुक नाही. मात्र, सिंधिया यांनी पक्षाच्या निर्णयापेक्षा वेगळे मत व्यक्त केले आहे. यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया
Last Updated : Aug 6, 2019, 9:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details