ग्वाल्हेर- महाराष्ट्रातील सत्तापेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे, तर नुकतेच काँग्रेस महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल केला आहे. सिंधिया यांनी स्वतःला जनतेचा सेवक आणि क्रिकेटप्रेमी सांगितले आहे.
ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटर प्रोफाईलमध्ये 'असा' केला बदल - Jyotiraditya Scindia on tweeter
महाराष्ट्रातील सत्तापेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे, तर नुकतेच काँग्रेस महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल केला आहे. सिंधिया यांनी स्वतःला जनतेचा सेवक आणि क्रिकेटप्रेमी सांगितले आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं जनतेला दिलेली होती, त्याची आठवण करून देणारी अनेक पत्रे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लिहीली आहेत. सामान्यांच्या त्रासांबद्दल सरकारने पत्र लिहीली. मात्र, त्याचे काही खास परिणाम सरकारच्या निर्णयांमध्ये दिसून आलेले नाहीत.
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष कायम आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या सत्तास्थापनेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत. महाराष्ट्रात इतक्या घडामोडी घडत असताना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रोफाईल अपडेट करण्यामागे काही कारण असू शकतात का? हे अद्याप समोर आलेले नाही.