भूवनेश्वर - न्यायमूर्ती मोहम्मद रफीक यांनी सोमवारी ओडीसा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. भूवनेश्वरच्या लोकसेवा भवन येथे ओडीसाचे राज्यपाल प्रो. गणेश लाल यांच्या हस्ते त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यासोबतच न्यायमूर्ती मोहम्मद रफीक हे ओडीसा उच्च न्यायालयाचे ३१ वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आजपासून पदभार सांभाळतील.
न्यायमूर्ती मोहम्मद रफीक हे ओडिशा उच्च न्यायलयाचे नवे मुख्य न्यायाधीश - ओडीसा उच्च न्यायालय
न्यायमूर्ती मोहम्मद रफिक यांनी सोमवारी ओडिशा उच्च न्यायालयाचे 31 वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. यापूर्वी ते मेघालय उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यरत होते.
न्यायमूर्ती मोहम्मद रफीक हे ओडीसा उच्च न्यायलयाचे नवे मुख्य न्यायाधीश
याआधी न्यायाधीश रफीक हे मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदीही नियुक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांनी दोनदा राजस्थान उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले आहे.
तर, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती बिस्वनाथ सोमाडेर यांची नियुक्ती करण्यात आली असून आज(सोमवारी) त्यांचाही शपथविधी सोहळा पार पडला आहे.