नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना आज(शुक्रवार) सकाळी फाशी देण्यात आली. तब्बल ७ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर आरोपींना फासावर लटकावण्यात आले. यावर अनेक राजकीय मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा खास ट्विट करून न्यायाचाच विजय झाला असे म्हटले आहे.
निर्भया प्रकरण : 'अखेर न्याय मिळाला' पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया - Justice has prevailed
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना आज(शुक्रवार) सकाळी फाशी देण्यात आली.यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा खास ट्विट करून न्यायाचाच विजय झाला असे म्हटले आहे.
'निर्भयाला न्याय मिळाला. देशातील महिलांची सुरक्षा आणि सन्मानासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. समानता आणि संधीचा पुरस्कार करणारे, तसेच महिला सक्षमीकरणावर भर देणारे राष्ट्र आपल्याला निर्माण करायचे आहे', असे टि्वट मोदींनी केले आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. त्यामुळे पीडितेसह कुटुंबीयांना सात वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 ला घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता. तेव्हापासून दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी निर्भयाचे कुटुंबीय आणि संपुर्ण देश वाट पाहत होता.