महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ममताजींचा 'जुमला मीटर' मोदींच्या अनेक घोषणांना ठरवतोय खोटे - Election

भाजपने आपल्या राज्यात प्रवेश करू नये, यासाठी ममता बॅनर्जी यांनी सर्व प्रकारचा बंदोबस्त केला आहे. सारदा चिटफंड घोटाळ्यावरून राज्यात पडलेली सीबीआय धाड असो, की भाजपच्या सभा. सर्वच स्तरांवर त्यांनी भाजपला रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता त्यांनी डिजीटल माध्यमातून पंतप्रधानांवर टीका करणे सुरू केले आहे.

ममता बॅनर्जी यांचा जुमला मिटर

By

Published : Mar 28, 2019, 10:29 PM IST

नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सर्व पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसुद्धा मागे नाहीत. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या 'नाकात दम' केल्यानंतर आता त्यांनी पंतप्रधान मोदीं विरोधात 'वेब वार' छेडला आहे. तृणमूल काँग्रेसच्या वेबसाईटवर त्यांनी जुमला मिटर नावाचे एक वेगळेच फिचर जोडले आहे. या फिचरवरून राजकीय वर्तुळात जबरदस्त चर्चा रंगत आहे.

भाजपने आपल्या राज्यात प्रवेश करू नये, यासाठी ममता बॅनर्जी यांनी सर्व प्रकारचा बंदोबस्त केला आहे. सारदा चिटफंड घोटाळ्यावरून राज्यात पडलेली सीबीआय धाड असो, की भाजपच्या सभा. सर्वच स्तरांवर त्यांनी भाजपला रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता त्यांनी डिजीटल माध्यमातून पंतप्रधानांवर टीका करणे सुरू केले आहे.

www.aitcofficial.org या त्यांच्या पक्षाच्या वेबसाईटवर जुमला मिटर नावाचे एक नवे फिचर जोडले आहे. त्यामध्ये मोदींनी आत्तापर्यंत केलेल्या घोषणांचा समावेश आहे. या घोषणा कितपत खऱ्या ठरल्या त्यावर एक मिटर देण्यात आला आहे. त्या मिटवर क्लिक करताच पंतप्रधान मोदी काय म्हणाले आणि मुळात खरे काय, हे स्पष्ट केले आहे. त्यासाठी त्यांनी विविध रिपोर्टचा संदर्भही दिला आहे.

ममताजींच्या मिटरमध्ये २०१४ पासून आत्तापर्यंत मोदी किती खोटे बोलले याचा समावेश आहे. तर, बलात्कार, भ्रष्टाचार आणि विविध अन्यायांवर मोदींनी मांडलेल्या अनेक आकड्यांचा त्यांनी तपशील दिला आहे. हे आकडे सांगताना मोदी काय खोटे बोलले, हेही त्यांनी सांगितले आहे.

पीक विमा योजने बद्दल मोदी यांनी सांगितलेल्या माहितीला ममताजींचा जुमला मिटर खोटे असल्याचे सांगत आहे. साई बाबा समाधी येथे आयोजित एका कार्यक्रमात मोदी यांनी चार वर्षात १.२५ कोटी घरे बनवल्याचे सांगितले होते. त्या माहितीलाही जुमला मिटरने खोटे ठरवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details