नवी दिल्ली -सार्वजनिक ठिकाणी आपला फोन चार्ज करण्यापासून सावध रहा. सार्वजनिक ठिकाणी देण्यात आलेल्या विनामूल्य चार्जिंग पॉईंट्सच्या माध्यमातून आपला डेटा चोरण्याचे काम हॅकर्स करीत आहेत. चार्जिंग करण्यासाठी सोयीचे साधन म्हणून मानले जाणारे चार्जिंग पॉईंट्स आता मोबाईल फोनमधील खासगी डेटा चोरी करत असल्याने लोकांसाठी एक नवीन समस्या बनत आहे.
सायबर क्राईमच्या शब्दसंग्रहात आणखी एक नवीन संज्ञा जोडली गेली आहे. जिचे नाव आहे 'ज्यूस जॅकिंग.' बरेचजण याला बळी पडले आहेत. मा, यापासून वाचण्यासाठी अशा ठिकाणी चार्जिंग करताना जागरूक राहण्याशिवाय दुसरी कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. जेंव्हापासून मोबाईल फोनची चार्जिंग केबल सोयीसाठी डेटा केबलमध्ये रूपांरित केली गेली आहे, तेव्हापासून दुसऱ्याच्या फोनमधील खासगी डेटा हॅक करण्यासाठी ज्यूस जॅकिंग हा सोपा मार्ग सापडला आहे.
विनामूल्य चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या ठिकाणी, म्हणजे, विमानतळ, बस स्थानके, रेल्वे स्थानक, उद्याने आणि मॉल्ससारख्या सार्वजनिक ठिकाणांना हॅकर्स लक्ष्य करतात. चार्जिंग तसेच प्रीप्रोग्राम्ड डेटा केबलच्या (डेटा देवाणघेवाण करण्याची सोया असलेली केबल) माध्यमातून व्यक्तीचे तपशील हस्तांतरित केले जातात. बँकिंगसाठी वापरल्या जाणारे सांकेतिक शब्द / पासवर्ड, सोशल मीडिया प्रोफाइल, वैयक्तिक डेटा आणि छायाचित्रे इत्यादी माहिती मिळविणे हॅकर्सला सहज शक्य होते. पासवर्ड बदलून किंवा रीसेट करून किंवा डिव्हाइसला किंवा फोनला लॉक करून किंवा वैयक्तिक डेटा मिळवून ब्लॅकमेल केले जाऊ शकते.
गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त संदीप पाटील म्हणाले की, आयटी राजधानी म्हणून ओळख असलेल्या बंगळुरू शहरात आणि राज्यात सायबर गुन्हे वाढत आहेत, “आम्ही स्थानिक पोलिस स्टेशन, सीसीबी किंवा सायबर-क्राइम स्टेशनच्या माध्यमातून चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध असलेल्या सार्वजनिक ठिकाणांची तपासणी करत आहोत. अशा चार्जिंग पॉईंट्सवरून हा गुन्हा केला जाऊ शकतो याची लोकांना माहिती झाली की ते आवश्यक ती खबरदारी बाळगतील.