कोलकाता -कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व वाहतूक बंद आहे. त्यामुळे आपला नवीन कार्यभार सांभाळण्यासाठी नेमणूक झालेल्या दोन न्यायाधिशांनी चक्क पायी प्रवास पूर्ण केला आहे. न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश विश्वनाथ सोमादार, अशी या दोन न्यायाधिशांची नावे आहेत. न्यायालयीन कामकाजामध्ये अडथळा येऊ नये, म्हणून त्यांनी पायीच प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता.
न्यायाधीश दीपांकर दत्ता हे कोलकाता येथील उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. ते आता मुंबईतील उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. तर, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विश्वनाथ सोमाद्दर यांची मेघालय येथील उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आहे.
न्यायमुर्ती सोमाद्दर हे शनिवारी दुपारी अलाहाबादवरुन मेघालयकडे रवाना झाले होते. ते रविवारी दुपारी मेघालयची राजधानी शिलॉंग येथे पोहोचले. न्यायमूर्ती दत्ता हे कोलकत्तावरुन मुंबईसाठी रवाना होण्यासाठी शनिवारी सकाळी निघाले होते. ते सोमवारी दुपारी मुंबई येथे पोहोचले.