पलामू (झारखंड)- पलामू येथील मेदिनीनगर मैदानात भाजप बूथ शक्ति सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून भाजपनं झारखंड विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. या दरम्यान भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजब सल्ला दिला आहे. लोक तुम्हाला दहा प्रश्न विचारतील, पण तुम्ही त्यांना फिरवून कलम 370 आणि तिहेरी तलाकवर घेउन या, असं ते म्हणाले आहेत.
लोक तुम्हाला दहा प्रश्न विचारतील, तुम्ही त्यांना फिरवून कलम 370 आणि तिहेरी तलाकवर घेउन या- जे. पी. नड्डा - ट्रिपल तलाक
पलामू येथील मेदिनीनगर मैदानात भाजप बूथ शक्ति सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून भाजपनं झारखंड विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. या दरम्यान भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजब सल्ला दिला आहे. लोक तुम्हाला दहा प्रश्न विचारतील, पण तुम्ही त्यांना फिरवून कलम 370 आणि तिहेरी तलाकवर घेउन या, असं ते म्हणाले आहेत.
लोक तुम्हाला दहा प्रश्न विचारतील, तुम्ही त्यांना फिरवून कलम 370 आणि तिहेरी तलाकवर घेउन या- जे. पी. नड्डा
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा निवडणुकीदरम्यान जनता काहीही प्रश्न विचारू शकते. त्यांना बगल देत तुम्ही कलम ३७० आणि तिहेरी तलाकवर बोलत रहा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांचं हे वक्तव्य वादात अडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, झारखंडमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार असून भाजपने ६५ पेक्षआ जास्त जागा जिंगण्याचं ध्येय ठेवलं आहे.