जयपूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज (शनिवार) व्हर्च्युअल रॅलीद्वारे राजस्थानमधील कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. भाजप कोरोनाच्या विरोधात लढत असताना, काँग्रेस मात्र, राजकारण करत असल्याचा आरोप नड्डा यांनी केला.
कोरोनाच्या संकटात काँग्रेस करतेय राजकारण, जे पी नड्डांचा निशाणा भाजपने केलेल्या दाव्यानुसार व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून १ कोटी लोक जोडले गेले आहेत. नड्डा यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच चीनच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच देशासाठी हुतात्म्य पत्करलेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे नड्डा यांनी म्हटले. तसेच कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांनाही नड्डा यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
कोरोनाच्या संकटात काँग्रेस करतेय राजकारण, जे पी नड्डांचा निशाणा या कोरोनाच्या संकटात मोदी सरकार सर्वांना सोबत घेऊन लढत आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. ज्या जन धन योजनेला काँग्रेसने विरोध केला, त्याच जनधन खात्याचा २० कोटी नागरिकांना फायदा झाला. २० कोटी नागरिकांच्या खात्यात ३ महिन्यात दीड हजार रुपये जमा झाले. या कोरानाच्या काळातही काँग्रेस राजकारण करत असल्याचे नड्डा म्हणाले.
राजस्थानमधील भाजपचे कार्यकर्ते कोरोनाच्या काळात लोकांची सेवा करत आहे. मात्र, तेथील काँग्रेसचे सरकार त्यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याचे नड्डा म्हणाले. राजस्थानमध्ये भाजपकडून आत्तापर्यंत २५ लाख मास्क आणि पीपीई किट्सचे वाटप करण्यात आले आहे.