चंदिगड - हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना बहुमत न मिळाल्याने राज्यामध्ये त्रिशंकू परस्थिती निर्माण झाली होती. अखेर आज जनता जननायक पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजप आणि जेजेपी दरम्यान चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह यांनी दोन्ही पक्षादरम्यान युती होत असून मुख्यमंत्री भाजपचा तर उपमुख्यमंत्री जेजेपीचा राहील अशी घोषणा केली आहे.
जेजेपी पक्षाची स्थापना दुष्यंत चौटाला यांनी नव्यानेच केली आहे. दुष्यंत चौटाला हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे नातू आहेत. तर चौधरी देवी लाल यांचे पुणतू आहेत. चौधरी देवी लाल व्ही पी. सिंग सरकारमध्ये उप-पंतप्रधान होते. इंडियन नॅशनल लोकदल पक्षातून बाहेर पडून त्यांनी जेजेपी पक्षाची स्थापना केली.
९० सदस्यांच्या विधानसभेत भाजपने ४० जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या असून जननायक जनता पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत. याचबरोबर ७ अपक्ष उमेदवारांनीही विजयाची नोंद केली आहे.