महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महिला दिन विशेष : कला क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या बिहारच्या शांती जैन यांची कहाणी... - etv bharat womens day stories

कला क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या बिहारच्या शांती जैन यांची भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी निवड केली आहे.

Journey of Shanti Jain: The folk queen of Bihar
Journey of Shanti Jain: The folk queen of Bihar

By

Published : Mar 7, 2020, 9:10 AM IST

पाटणा - कला क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या बिहारच्या शांती जैन यांची भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी निवड केली आहे. शांती या लोकगीत आणि लोक साहित्य क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत. छट महापर्वांवर पुस्तक लिहणाऱ्या त्या पहिल्या लेखिका आहेत.

शांती यांनी वयाच्या 6 वर्षांपासून कविता करायला सुरुवात केली. 9 वर्षाच्या असतानाचे त्यांचे पहिले लिखान प्रकाशीत झाले होते. 1977 पासून त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन होऊ लागले. पहिल्या पुस्तकासाठी त्यांना राजभाषा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

'लखनौ संगीत नाटक अँकडमीने मला चैतीवर 150 पानांचे पुस्तक लिहण्यास सांगितले होते. त्या पुस्तकासाठी मला राजभाषा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मला लोकभाषावर लिहण्यास रस निर्माण झाला. पुरस्कारांनी आणखी चांगले काम करण्यास अधिक उर्जा आणि प्रेरणा मिळते', असे त्या म्हणाल्या.

आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण शांती यांचे भजन ऐकायचे. त्यांचे भजन ऐकल्याशिवाय त्यांना झोप येत नसे.लोक साहित्य आणि लोकसंगीत क्षेत्रामध्ये शांती जैन यांचे मोलाचे योगदान आहे. कवितांवर त्यांची 12 पुस्तके प्रकाशीत आहेत. तर लोक साहित्यावर 14 पुस्तके प्रकाशीत आहेत. त्यांना लोक साहित्य आणि संगीत साहित्यावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details