हैदराबाद -तेलंगाणामधील एका तेलुगु वृत्तवाहिनीमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनासाठी समर्पित असलेल्या गांधी रुग्णालयामध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला.
या ३६ वर्षीय पत्रकाराला ४ जून रोजी गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी तो दुसऱ्या एका सरकारी रुग्णालयात दाखल होता. त्यावेळी त्याला टाईप-१ रेस्पिरेटरी फेल्युअर आणि अक्युट रेस्पिरेटरी डिसीज सिंड्रोम (एआरडीएस) असे दोन्ही असणारा बायलॅट्रल न्यूमोनिया होता. यासोबतच त्याला दुर्धर असा मॅस्थेनिया ग्रेव्हिस हा न्यूरोमस्क्यूलर आजार होता. यामुळे मसल्स कमकुवत होतात, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.