इस्लामाबाद - पाकिस्तानातील भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गुरुवारी मोठ्या उत्साहात तिरंगा फडकवण्यात आला आहे. पाकिस्तानातील उच्च आयोगामध्ये झेंडा फडकतच राहील, असे भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी टि्वट केले आहे.
जोश इज हाय..! पाकिस्तानात डौलाने फडकला भारताचा राष्ट्रध्वज, पाहा व्हिडिओ
पाकिस्तानातील भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गुरुवारी मोठ्या उत्साहात तिरंगा फडकवण्यात आला आहे.
' भारताच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इस्लामाबाद येथील भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात भारतीय तिरंगा फडकवण्यात आला. इथला जोश खूप जास्त आहे. जय हिंद, असे इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट केले आहे. यावेळी अधिकारी गौरव अहलुवालिया यांनी राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रपतींचा संदेश वाचला.
कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान कावराबावरा झाला आहे. पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत पाठवले आहे. शिवाय त्यांचे भारतातील उच्चायुक्त मोईन उल हक्क यांना माघारी बोलावून घेतले आहे.