श्रीनगर -जम्मू काश्मीरमधील काका सराय या भागामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षादल आणि पोलिसांवर ग्रेनेड हल्ला केला आहे. यामध्ये 6 जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान संपुर्ण भागात शोध मोहीम सुरू आहे.
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 6 जवान जखमी - Srinagar's Karan Nagar area
जम्मू काश्मीरमधील काका सराय या भागामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षादल आणि पोलिसांवर ग्रेनेड हल्ला केला आहे.

घटना सायंकाळी 6:50 मिनिटांनी झाली आहे. जखमी झालेले जवान 144 बटालीयनमधील आहेत. सीआरपीएफच्या जवानांवर ग्रेनेड फेकून दहशतवादी फरार झाले. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य केल्यानंतर जवानांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलाने करनगर भागात कडक बंदोबस्तासह नाकाबंदी केली आहे.
गुरुवारी दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या दोन ट्रकवर गोळीबार केला होता. या घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला होता. काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यापासून काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण वातावरण आहे. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. अनेक ठिकाणी लष्कराचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचे करण्याचा प्रयत्न दहशतवादी सातत्याने करत आहेत.