नवी दिल्ली - राष्ट्रीय पातळीवर होणारी जेईई मेन्स ही 'ग्रूप ए'ची परीक्षा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार होती. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन 'राष्ट्रीय परीक्षा एजन्सी'ने ही परीक्षा आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याची घोषणा केले आहे. याआधी जेईई या परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारीमध्ये पार पडला होता. परिक्षेच्या माध्यमातून अभियांत्रीकी आणि आर्किटेक्चरच्या पदवी अभ्यासाक्रमासाठी प्रवेश दिला जातो. केंदीय मणुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्वीटरच्या माध्यमातून परीक्षा पुढे ढकलल्याची सूचना दिली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील आयआयटी, एनआयटी यांसारख्या नामवंत संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई ही परीक्षा घेतली जाते. बारावी नंतरचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात दहा हजार विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा दिली होती.