नवी दिल्ली - जेएनयूचे म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीशकुमार यांच्यावर आज (शनिवार) काही विद्यार्थ्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा दावा खुद्द कुलगुरूंनीच केला आहे.
काही विद्यार्थी माझ्यावर करणार होते हल्ला - एम. जगदीशकुमार - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ
जेएनयूचे म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीशकुमार यांच्यावर आज (शनिवार) काही विद्यार्थ्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एम. जगदीश कुमार
त्यांच्या म्हणण्यानुसार, कुलगुरू एम. जगदीशकुमार हे 'स्कूल ऑफ आर्ट्स अँड अॅस्थेटिक्स' येथे गेले होते. त्यावेळी 10 ते 15 विद्यार्थ्यांनी घेरून त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला. खाली खेचून त्यांच्यावर हल्ला करण्याची तयारी होती. पण, त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना वाचविले. दरम्यान, त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे ते म्हणाले.