JNU आंदोलन: रस्त्यावर बसून अभ्यास करत विद्यार्थ्यांचा मोर्चा
विद्यापीठातील आंदोलना नंतर विद्यार्थ्यांनी थेट संसदेपर्यंत मोर्चा नेला होता. आता विद्यार्थी रस्त्यावर बसून अभ्यास करत आंदोलन करत आहेत.
JNU आंदोलन
नवी दिल्ली - शुल्क वाढ आणि हॉस्टेल नियमावली विरोधात सुरू केलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन महिना उलटून गेले तरी सुरूच आहे. विद्यापीठातील आंदोलनानंतर विद्यार्थ्यांनी थेट संसदेपर्यंत मोर्चा नेला होता. आता विद्यार्थी रस्त्यावर बसून अभ्यास करत आंदोलन करत आहेत.
मानव संसाधन विकास विभागाने दिलेला अहवाल उघड करा
१२ डिसेंबरपासून सुरू होणार परीक्षा
जेएनयू विद्यापीठाची १२ डिसेंबरपासून दुसरी सत्र परीक्षा सुरू होत आहे. मात्र, तरीही विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. परीक्षा जवळ आल्या असतानाही विद्यार्थी आंदोलन करत आहेत. अभ्यास आणि संघर्ष हातात हात घालून चालत असल्याचे भाषा विभागाची विद्यार्थिनी तमन्ना हिने 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
जेएनयू प्रशासनाने जारी केला आदेश
विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना प्रशासनाने एक आदेश जारी केला आहे. सर्व शिक्षकांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच परीक्षेच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना असाईनमेट्स जमा करण्यास सांगण्यात आले आहे.