JNU आंदोलन : विद्यार्थी म्हणतात.. तुम्ही आमचे कुलगुरू नाही, संघाच्या शाखेत परत जा
तुम्ही आमचे कुलगुरू नाही, तुमच्या संघाच्या शाखेत परत जा, असा मजकूर विद्यार्थांनी कुलगुरू कार्यालयाबाहेर लिहला आहे. तसेत दरवाजावरील कुलगुरू यांच्या नावाची पाटीही काढून टाकली आहे.
JNU आंदोलन
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) मागील २ आठवड्यांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. वसतिगृह नियमावली आणि शुल्क वाढीविरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. बुधवारी विद्यार्थ्यांनी कुलगुरु एम. जगदीश कुमार भेटत नाहीत म्हणून त्यांचे कार्यालय रंगवले आहे. विद्यार्थ्यांनी दरवाजावर निषेध व्यक्त करणारा मजकूर लिहला आहे.
तुम्ही आमचे कुलगुरु नाही, तुमच्या संघाच्या शाखेत परत जा, असा मजकूर विद्यार्थांनी कार्यालयाबाहेर लिहला आहे. तसेच दरवाजावरील कुलगुरू यांच्या नावाची पाटीही काढून टाकली आहे. कार्यालयाबाहेरील जागा सेल्फी पॉईंट असल्याचे विद्यार्थ्यांनी लिहले आहे. मागील काही दिवसांपासून आम्ही कुलगुरू जगदीश कुमार यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत असून कुलगुरू आम्हाला भेटत नाहीत. ते त्यांच्या कार्यालयातही येत नाहीत. आम्ही त्यांची भेट घेण्याचा सतत प्रयत्न करत आहोत, मात्र, ते आम्हाला भेटत नाहीत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
कुलगुरु भेटत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, विद्यार्थ्यांनीपवित्रा
विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत विद्यार्थ्यांना शुल्क वाढीतून सुट देण्यात आली आहे. मात्र, हा काही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा सेल नाही, त्याद्वारे १० ते ५ टक्के सुट देण्यात येत आहे. प्रशासन २७ ऑक्टोबरला जाहीर केलेला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.