महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 4, 2019, 11:07 AM IST

ETV Bharat / bharat

जेएनयूच्या विद्यार्थांचा ईटीव्ही भारतच्या पत्रकारांवर हल्ला

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात एका कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या ईटीव्ही भारतच्या पत्रकारावर विद्यार्थ्यांनी हल्ला केला.

जेएनयू

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या ईटीव्ही भारतच्या पत्रकारावर विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. जेएनयू विद्यापीठामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी गेले असताना कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पत्रकाराला मारहाण केली.

जेएनयूच्या विद्यार्थांनी ईटीव्ही भारतच्या पत्रकारावर केला हल्ला

जेएनयू विद्यापीठामध्ये गुरुवारी जम्मू काश्मीरचे अनुच्छेद ३७० हटवल्याच्या विषयी एका चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमाला काही विद्यार्थांचा विरोध होता. पोस्टर आणि घोषणा देत विद्यार्थी विरोध करत होते. त्याचे रिपोर्टींग करण्यासाठी ईटीव्हीचे पत्रकार गेले होते.

विद्यार्थींनी चित्रिकरण करण्यास विरोध केला. त्या दरम्यान झालेल्या वादामध्ये विद्यार्थांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली. तसेच पत्रकारा जवळील कॅमेरा आणि माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच धमकीही दिली.

कॅमेरा पाहून झाकले चेहरे

काश्मीसंबधी विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्याला विद्यार्थ्यांचा विरोध होता. मात्र, कॅमेऱ्यासमोर येण्यास विद्यार्थी घाबरत होते. कॅमेऱ्याने निदर्शन चित्रित करण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला असता विद्यार्थ्यांनी पोस्टरमागे चेहरे लपवले. भांडण करत चित्रण थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच अभद्र भाषेत शिवीगाळ केली. माध्यमांवर हल्ला करण्याचा मुजोरपणा जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मागण्यासाठी जेएनयूचे विद्यार्थी आंदोलने करतात, मात्र, स्वत: दुसऱ्यांच्या स्वांतत्र्यावर गदा आणतावना दिसून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details