महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जेएनयू हिंसाचार : योगेंद्र यादव यांनाही धक्काबुक्की - jnu protest Yogendra Yadav latest news

घटनेची माहिती मिळताच स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव जेएनयू येथे पोहोचले. मात्र, त्यांच्या विरूध्ददेखील यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.

yogendra yadav
योगेंद्र यादव

By

Published : Jan 6, 2020, 2:39 AM IST

नवी दिल्ली -जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) मध्ये डावे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. यानंतर या घटनेची माहिती मिळताच स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव जेएनयू येथे पोहोचले. मात्र, त्यांच्या विरूध्ददेखील यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.

कुलगुरूंनी राजीनामा द्यावा -

या घटनेची योगेंद्र यादव यांनी निंदा केली आहे. तसेच ते म्हणाले, इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना पहावयास मिळाली आहे. जेएनयूचे कुलगुरू डॉ. एम. जगदीश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा -गृहमंत्र्यांनी भाषणातून मला फक्त शिव्याच दिल्या, केजरीवालांचा पलटवार

ABOUT THE AUTHOR

...view details