महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 10, 2019, 2:14 PM IST

ETV Bharat / bharat

जेएनयू आंदोलन : प्रशासन परीक्षेनंतर चर्चेला तयार, मात्र. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच

विद्यापीठ प्रशासन चर्चेला तयार नाही, असे म्हणत विद्यार्थ्यांनी १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, चर्चेला तयार असल्याचे उत्तर प्रशासनाकडून आले आहे. मात्र, चर्चा परीक्षा झाल्यानंतरही होऊ शकते, विद्यार्थ्यांच्या भविष्याबरोबर खेळणे योग्य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

jnu
जेएनयू संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील म्हणजेच जेएनयूमधील विद्यार्थी आणि प्रशासनातील वाद अजूनही मिटलेला नाही. प्रशासन चर्चेला तयार नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र, जेएनयू प्रशासन कायमच चर्चेला तयार आहे, असे उत्तर विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांनी केले आहे.

विद्यापीठ प्रशासन चर्चेला तयार नाही, असे म्हणत विद्यार्थ्यांनी १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, चर्चेला तयार असल्याचे उत्तर प्रशासनाकडून आले आहे. मात्र, चर्चा परीक्षा झाल्यानंतरही होऊ शकते, विद्यार्थ्यांच्या भविष्याबरोबर खेळणे योग्य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

वाढलेले शुल्क आणि होस्टेल नियमावली विरोधात जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाने हिंसक वळणही घेतले होते. उच्चस्तरीय चर्चा, बैठका होऊनही यावर तोडगा निघालेला नाही. आम्ही प्रशासनाबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्याशी चर्चा केली नाही, असे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी चर्चा होण्याची शक्यता

परीक्षांवर बहिष्कार घालणे चुकचे आहे. त्यामुळे वर्षभर अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर चर्चा केली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी संसदेपर्यंत आंदोलन नेत नवीन नियमावली आणि शुल्क वाढीचा विरोध केला. मात्र, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही

ABOUT THE AUTHOR

...view details