महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

JNU आंदोलन: कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी विद्यापाठाची पोलिसांत तक्रार - jnu protest

विद्यार्थ्यांनी कुलगुरु भेटत नाहीत यावरुन कार्यालयाच्या भिंती रंगवल्या आहेत. तसेच कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी कुलगुरुंनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

JNU आंदोलन

By

Published : Nov 15, 2019, 2:33 PM IST

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात शुल्क वाढ आणि वसतिगृह नियमावलीवरून मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. विद्यार्थ्यांनी कुलगुरु भेटत नाहीत यावरुन कार्यालयाच्या भिंती रंगवल्या आहेत. तसेच कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी कुलगुरुंनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गुरुवारी रात्री ११ वाजता तक्रार दाखल करण्यात आल्याचे कुलगुरु एम. जगदीश कुमार यांनी सांगितले. तोडफोडीचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून पोलिसांकडे सादर केले आहेत. पुराव्यांची तपासणी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बुधवारी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कार्यालयावर उजव्या गटासंबधीत संदेश लिहले होते. कुलगुरु कार्यालयाच्या दरवाजावरही विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह संदेश लिहले होते. विद्यापीठ परिसरात स्वामी विवेकानंद यांचा पुतळ्यावरही आक्षेपार्ह मजकूर लिहला आहे. यावरुन विद्यापीठ प्रशासनाने तक्रार दाखल केली आहे.

कुलगुरु भेटत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, विद्यार्थ्यांनी पवित्रा

विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत विद्यार्थ्यांना शुल्क वाढीतून सुट देण्यात आली आहे. मात्र, हा काही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा सेल नाही, त्याद्वारे १० ते ५ टक्के सुट देण्यात येत आहे. प्रशासन २७ ऑक्टोबरला जाहीर केलेला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details