महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 13, 2019, 6:24 PM IST

ETV Bharat / bharat

जेएनयू : विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अखेर शुल्कवाढ मागे..

हॉस्टेल, तसेच मेसच्या अनामत रकमेमध्ये प्रशासनाने वाढ केली होती. ती आता मागे घेण्यात आली आहे. तसेच विद्यापीठ प्रशासनाने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी विशेष योजना आखल्याचे, केंद्रीय शिक्षण सचिव सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.

JNU hostel fee hike roll-back

नवी दिल्ली -जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांचे काही दिवसांपासून आंदोलन सुरू होते. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ही शुल्कवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण सचिव आर. सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली.

हॉस्टेल, तसेच मेसच्या अनामत रकमेमध्ये प्रशासनाने वाढ केली होती. ती आता मागे घेण्यात आली आहे. तसेच विद्यापीठ प्रशासनाने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी विशेष योजना आखल्याचेही सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाने केलेली शुल्कवाढ, ड्रेस कोड, कर्फ्युची वेळ आदी नियम मागे घेण्याची मागणी विद्यार्थी करत होते. दोन आठवड्यांपासून त्याबाबत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते.

ABOUT THE AUTHOR

...view details