रांची- ओडिशामध्ये अडकलेल्या विस्थापित कामगारांची मदत करा, अशी विनंती झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना केली आहे. देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील कित्येक कामगार परराज्यांमध्ये अडकले आहेत.
सोरेन यांनी पटनाईक करत असलेल्या कामाचे कौतुकही केले आहे. ओडिशामध्ये अडकलेल्या झारखंडच्या अनेक कामगारांसाठी पटनाईक यांनी मदतीची व्यवस्था केली आहे असे सोरेन म्हटले. मात्र, ओडिशाच्या झार्सुगुडामध्ये झारखंडचे आणखी २५ कामगार अडकले आहेत. त्यांच्याकडे खाद्यपदार्थही शिल्लक नाहीत, त्यामुळे पटनाईक यांनी तातडीने त्यांच्या मदतीसाठी पावले उचलावीत अशी विनंती सोरेन यांनी केली.