जम्मू-काश्मीर - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या घटना वाढत चालल्या आहेत. मंगळवारी दहशतवाद्यांनी पुलवामा पोलीस ठाण्याच्या परिसरात ग्रेनेड फेकले. या ग्रेनेडच्या स्फोटात ३ नागरिक गंभीररीत्या जखमी झाले असून आणखी काही जण जखमी झाले आहेत. या संपूर्ण परिसराला सुरक्षा पथकांनी घेराव घातला आहे.
पुलवामा पोलीस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला, ३ नागरिक गंभीर जखमी - jawan
याआधी सोमवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या वाहनांना लक्ष्य करून आयईडी स्फोट घडवून आणला होता. यात ९ जवान जखमी झाले होते. यातील दोघांना वीरमरण आले.
मंगळवारी पहाटे अनंतनाग येथील चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. यात एका जवानाला वीरमरण आले. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा हल्ल्याच्या शेवटचा सूत्रधार सज्जाद मकबूल बट्टला सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातले. त्याने पुलवामा हल्ल्यासाठी आपली गाडी दिली होती. त्याच्याबरोबर तौसिफ हा दहशतवादीही ठार झाला. काही अंशी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश येत असले, तरी त्याच वेळी अनेक जवानांनाही जीव गमावण्याची वेळ येत आहे. इतकी किंमत मोजूनही दहशतवादी कारवाया कमी झालेल्या नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सुळसुळाट झाल्याचे वास्तव समोर आहे.
याआधी सोमवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या वाहनांना लक्ष्य करून आयईडी स्फोट घडवून आणला होता. यात ९ जवान जखमी झाले होते. यातील दोघांना वीरमरण आले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून आयईडी हल्ला करण्यात येईल, असा अलर्ट एका दिवसापूर्वीच आला होता. त्यानंतर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. तरीही हल्ला करण्यात दहशतवाद्यांना यश आले. मात्र, हा स्फोट झाल्यानंतर लष्कराने जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. यादरम्यान आज पुलवामामध्येच पोलीस ठाण्याला लक्ष्य करण्यात आले.