पूंछ - जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सोमवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. याला प्रत्युत्तर देताना भारताच्या एका जवानाला वीरमरण आले. याआधी पाकिस्तानने नौशेरा सेक्टरमधील राजौरी येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एका जवानाला वीरमरण
पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर दिले जात आहे.
पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर दिले जात आहे.
मागील काही दिवसांत प्रकाशित झालेल्या अहवालांमध्ये बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारताचा धसका घेतल्याचे म्हटले होते. तसेच, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ बंद केल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकमधील दहशतवादी तळ बंद झाल्याविषयी पडताळणी करण्याचा मार्ग उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. तसेच, भारतीय लष्कर पाकविषयी बेसावध राहणार नसल्याचेही ते म्हणाले होते. यानंतर काही वेळातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यावरून पाकने कोणताही धडा घेतला नसल्याचे बोलले जात आहे.